तलावांना संवर्धनातून संजीवनी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तलावांना संवर्धनातून संजीवनी
तलावांना संवर्धनातून संजीवनी

तलावांना संवर्धनातून संजीवनी

sakal_logo
By

वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
व्यापारी पेठ, चाक जोड आणि औषध निर्मिती केंद्र म्हणून पनवेलला विशेष महत्त्व होते. तसेच येथील बंदरावरून मिठाचा व्यापारसुद्धा केला जात असे. त्याचबरोबर पनवेलला तलावांचे शहर म्हणून आजही ओळखले जाते. अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या या तलावांमुळे शहराच्या सौंदर्यात एक प्रकारे भर पडली होती. मात्र ते दुर्लक्षित राहिल्याने हा ऐतिहासिक ठेवा लोप पावण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, आता या तलावांच्या जीर्णोद्धाराचा निर्णय पनवेल महापालिकेने घेतला असून या तलावांना ऐतिहासिक लूक देण्यात आल्यामुळे परिसराला वेगळीच झळाळी आली आहे.
--------------------------------
वडाळे तलाव
वडाळे तलाव मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत आहे. याला ‘बल्लाळेश्वर तलाव’ असेही संबोधले जाते. पनवेलसाठी मोठे ठिकाण मानले जाते. पनवेल शहराचे अतिशय महत्त्वाचे आणि मोक्याचे ठिकाणी हा जलाशय आहे. एकूण २५ एकर क्षेत्रफळ असलेल्या तलावाच्या आजूबाजूला मोठी मोकळी जागा आहे. १०७, ७९१ चौरस मीटर क्षेत्रफळ हे पाण्याने व्यापलेला आहे. जवळपास १.५२ किमीचा हा परिघ आहे. या ठिकाणी दरवर्षी सरासरी ३,२६७ मिमी वार्षिक पावसाची नोंद होते. पूर्वी वडाळे तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरले जात असे. या जलाशयामध्ये गणपती विसर्जन केले जाते. ऐतिहासिक तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. एकूण १३,८०,९१,४७० इतका खर्च या ठिकाणी करण्यात आला आहे.
--------------------------
रोडपाली, कामोठे तलावांचे रूप पालटले
रोडपाली आणि कामोठे गावामधील तलावांचे सिडकोने गाळ काढून रूप पालटून टाकले आहे. दोन ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन केले जाते. संबंधित गावांच्या दृष्टिकोनातून हे जलाशय अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे येथील परिसराचे सौंदर्यीकरण सिडकोने याअगोदरच केले आहे. या ठिकाणी जॉगिंग ट्रॅकबरोबर बसण्याची व्यवस्था तसेच विद्युतीकरण करण्यात आले. एक वेगळा लूक सिडकोकडून देण्यात आला आहे.
----------------------------------
खांदेश्वर, आदई तलावाला प्रतीक्षा
खांदेश्वर मंदिरालगत असलेला ऐतिहासिक तलवाचे सुशोभीकरण सिडकोकडून करण्यात येणार आहे. त्याबाबत आराखडाही तयार करण्यात आला होता. उपमहापौर सीता पाटील आणि दिवंगत नगरसेवक संजय भोपी यांनी या संदर्भात पाठपुरावा केला होता; परंतु कोरोनामुळे सुशोभीकरण थांबले. या परिसराचे मोडिफिकेशनसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा सुरू आहे. त्यानुसार संबंधित यंत्रणांकडून पावले उचलली जाण्याचा आशावाद रहिवासी व्यक्त करत आहे.
-----------------------------------------
इतर तलावांचे लवकरच सुशोभीकरण
पनवेल महापालिका हद्दीतील जुई गावामधील तलावाचेसुद्धा मनपाच्या वतीने सुशोभीकरण करण्यात आले आहे. सुमारे पावणेदोन कोटी रुपये खर्च करून येथील सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. त्याचेसुद्धा लोकार्पण करण्यात आले. याशिवाय खारघर, ओवे आणि तळोजातील तलावांचे सुशोभीकरण केले जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97278 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..