अमलीपदार्थ विक्री करणाऱ्या तिघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमलीपदार्थ विक्री करणाऱ्या तिघांना अटक
अमलीपदार्थ विक्री करणाऱ्या तिघांना अटक

अमलीपदार्थ विक्री करणाऱ्या तिघांना अटक

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १७ (बातमीदार) ः एका विशेष मोहिमेद्वारे पंतनगर पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांच्याकडून एक लाख ८९ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे मोहम्मद चौधरी, अब्दुल मलिक आणि मोहम्मद शेख अशी आहेत. त्यांच्यावर विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे आरोपी येथील सुविधा शौचालय, समता कॉलनी रेल्वे पोलिस वसाहतीलगतच्या पेट्रोल पंपाच्या बाजूला पूर्व द्रुतगती महामार्गावर गांजा विक्रीस आले होते. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्यांना अटक केली. हा तपास पोलिस निरीक्षक कोकरे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक किरण खरात, सचिन पाटील या अधिकाऱ्यांसह अंमलदारांनी केला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97280 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..