वर्तकनगरमध्ये ३ लाखांचा मुद्देमाल चोरीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्तकनगरमध्ये ३ लाखांचा मुद्देमाल चोरीला
वर्तकनगरमध्ये ३ लाखांचा मुद्देमाल चोरीला

वर्तकनगरमध्ये ३ लाखांचा मुद्देमाल चोरीला

sakal_logo
By

ठाणे, ता. १७ (बातमीदार) : वर्तकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत लोकमान्य नगरमध्ये बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्याने घरातील मुद्देमाल लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. यातील फिर्यादी वीरेंद्र रामदास पटोकार रा. लोकमान्य नगर, पाडा नंबर-३ हे कामानिमित्त बाहेर गेले असता शुक्रवारी १० वाजण्याच्या सुमारास चोरट्याने त्यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून लॉकरमधील तीन लाख दोन हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लांबवली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97287 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..