जिल्हास्तरीय सेवा पंधरवड्याला सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हास्तरीय सेवा पंधरवड्याला सुरुवात
जिल्हास्तरीय सेवा पंधरवड्याला सुरुवात

जिल्हास्तरीय सेवा पंधरवड्याला सुरुवात

sakal_logo
By

पालघर, ता. १७ (बातमीदार) : नागरिकांच्या अर्जांचा विहित कालावधीमध्ये निपटारा होत नाही अशी तक्रार करण्यात येते. या पार्श्वभूमीवर प्रलंबित अर्ज तक्रारींचा निपटारा करण्याकरिता १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेमार्फत राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा जिल्हास्तरीय शुभारंभ शनिवारी (ता. १७) करण्यात आला.

पालघर जिल्हा परिषद कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन आदेश, एतदर्थ मंडळाची मराठी परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सवलतीचे आदेश, अधिसंख्य पदावरून नियमित आस्थापनेवर सेवा वर्ग केल्याचे आदेश वाटप करण्यात आले. तसेच केळवे ग्रामपंचायत येथे अपंगांना यूडीआयडी कार्ड, जन्म-मृत्यू दाखले, रहिवासी दाखले असे एकूण २० लाभार्थ्यांना दाखलेवाटप करण्यात आले. या कालावधीत कालबद्ध पद्धतीने नियोजन करून प्रलंबित अर्जांचा निपटारा करून नागरिकांच्या समस्या, प्रश्न मार्गी लावले पाहिजेत, तरच या सेवा पंधरवड्याला न्याय दिल्यासारखे होईल, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे, चंद्रशेखर जगताप, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रवीण भावसार, कार्यक्रम अभियंता बांधकाम नितीन भोये, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे, कृषी विकास अधिकारी सूरज जगताप, शिक्षणाधिकारी संगीता भागवत उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97308 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..