नरेंद्राचार्य महाराजांच्या पादुका पुजन सोहळा संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नरेंद्राचार्य महाराजांच्या पादुका पुजन सोहळा संपन्न
नरेंद्राचार्य महाराजांच्या पादुका पुजन सोहळा संपन्न

नरेंद्राचार्य महाराजांच्या पादुका पुजन सोहळा संपन्न

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : नरेंद्राचार्य महाराज दक्षिण पीठ नाणीज यांच्या पादुकांचे मंगळवारी (ता. १३) सेंट्रल रेल्वे परळ वर्कशॉप वेल्फेअर हॉल येथे आगमन झाले. याप्रसंगी पादुकांची मिरवणूक काढण्यात आली. परळ येथील पादुका दर्शन सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती लाभली. गुरुपूजन झाल्यानंतर प्रवचन सुरू असताना स्थानिक शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट दिली. तसेच सेंट्रल रेल्वे सेक्रेटरी सूर्यकांत पंचगाम यांनीदेखील आपल्या सहकाऱ्यांसह कार्यक्रम ठिकाणी भेट दिली. प्रवचनकार ओंकार देशमुख यांनी प्रवचनात गुरूवरील भक्ती आणि गुरूवरील निष्ठा याचे महत्त्व सांगितले. या आधुनिक जगातसुद्धा गुरूवरील निष्ठा कशी फळाला येते याचे जिवंत उदाहरण देत त्यांनी मुंबई जिल्हा युवा अध्यक्ष नितीन बोटले यांचे उदाहरण दिले. याप्रसंगी १० कुटुंबांना घरघंटीचे वाटप करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97311 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..