अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By

ठाणे, ता. १७ (बातमीदार) : परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीशी वारंवार अत्याचार करत तिच्या इच्छेविरुद्ध लग्न करून सासरी छळ केल्याप्रकरणी आरोपी अक्षय सुनील चौहान यांच्या कुटुंबातील आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी १५ वर्षीय विवाहितीने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे आरोपी अक्षय चौहान याने तिच्याशी लगट करून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुलीने नकार दिला असता व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार संबंध प्रस्थापित केले. यात अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. मुलगी गर्भवती असल्याची माहिती कुटुंबीयांना मिळताच पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी निघालेल्या अल्पवयीन विवाहितेचे वडील यांना सुनील चौहान आणि परिवाराने समजूत काढीत समाजाच्या बैठकीत अल्पवयीन गर्भवती मुलीसोबत विवाह करून टाकला. त्यानंतर अल्पवयीन मुलगी आपल्या सासरी गेल्यानंतर छळ सुरू केला.
या छळाला कंटाळून अखेर अल्पवयीन विवाहिता एका अपत्यासह आपल्या पालकांच्या घरी आली. त्यानंतर तिने या छळाबाबत चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून चितळसर पोलिस ठाण्यात बालविवाह, लैंगिक अत्याचार, बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97312 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..