वसईत पुन्हा दरड कोसळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईत पुन्हा दरड कोसळली
वसईत पुन्हा दरड कोसळली

वसईत पुन्हा दरड कोसळली

sakal_logo
By

नालासोपारा, ता. १७ (बातमीदार): मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वसई पूर्वेच्या सातिवली कोंडापाडा येथील भागात दरड कोसळण्याची घटना घडली आहे. शनिवारी (ता. १७) सकाळी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वसई पूर्वेच्या भागात सातिवली परिसरात डोंगराला लागूनच कोंडापाडा वस्ती आहे. दोन दिवसांपासून वसईत पावसाचा जोर प्रचंड आहे. शनिवारी सकाळी सतत सुरू असलेल्या पावसामुळे कोंडापाडा येथे दरड कोसळण्याची घटना घडली. याची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी धाव घेतली. त्यात दरडीखाली अडकून पडलेला टेम्पो बाजूला करण्यात आला. सध्यस्थितीत दरड कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणी सर्व चाळीतील रूम खाली करून अतिक्रमण विभागामार्फत सील करण्यात आले आहेत. तसेच दरड कोसळलेला भाग मोकळा करण्यात आला असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. याआधीही राजावळी येथील वाघराळपाडा येथे अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या चाळींवर दरड कोसळली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97319 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..