कुर्ल्यात सोसायटीच्या परिपत्रकाने भीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुर्ल्यात सोसायटीच्या परिपत्रकाने भीती
कुर्ल्यात सोसायटीच्या परिपत्रकाने भीती

कुर्ल्यात सोसायटीच्या परिपत्रकाने भीती

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबईतील कुर्ला परिसरात एका हाऊसिंग सोसायटीच्या अंतर्गत दोन बेपत्ता मुलांबद्दलच्या परिपत्रकाने शुक्रवारी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले, परंतु स्थानिक पोलिसांनी परिपत्रकातील मजकुरात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. पोलिस ठाण्यात दोन मुले बेपत्ता झाल्याची कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
या परिपत्रकात केलेल्या दाव्यांबद्दल अधिक चौकशी करण्यासाठी सोसायटी व्यवस्थापकाला विनोबा भावेनगर पोलिसांनी बोलावले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुर्ला परिसरात प्रीमियर एक्झोटिका इमारतीने आपल्या सदस्यांसाठी एक संदेश जारी केला. संदेशात इमारतीतील दोन मुले बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात आली. सर्व पालकांना विनंती आहे, की त्यांनी खेळताना मुलांची काळजी घ्यावी आणि मुलांना तळघर/ पार्किंग/ लिफ्ट परिसरात एकटे सोडू नये, असे आवाहन संदेशात करण्यात आले आहे. पोलिसांनी या परिपत्रकातील दावे खोडून काढले. पोलिसांकडे मुले बेपत्ता झाल्याची नोंद नाही असे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97326 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..