दिघेंनी सुरू केलेल्या व्यायामशाळेला पालिकेचे सील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिघेंनी सुरू केलेल्या व्यायामशाळेला पालिकेचे सील
दिघेंनी सुरू केलेल्या व्यायामशाळेला पालिकेचे सील

दिघेंनी सुरू केलेल्या व्यायामशाळेला पालिकेचे सील

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी सावरकर नगर येथे २५ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या व्यायाम शाळेला पालिकेने टाळे ठेकले आहे. या व्यायामशाळेचे सात महिन्यांचे भाडे थकल्यामुळे तसेच अनधिकृत बांधकाम केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्टीकरण पालिकेने दिले आहे; मात्र ही व्यायामशाळा चालवणारे शिवअभिमान व्यायाम मंदिर संस्थेचे अध्यक्ष राजू शिरोडकर हे शिवसैनिक असल्याने शिंदे गटाच्या दडपशाहीमुळे ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
ठाण्याच्या सावरकर नगर या भागात एक हजार चौरस फुटाच्या जागेत व्यायामशाळा आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या उपस्थितीत सुरू झाली. या व्यायामशाळेची देखभाल शिवअभिमान व्यायाम मंदिर संस्थेच्या वतीने केली जाते. कोरोना संकटाच्या काळात दोन वर्षे ही व्यायामशाळा बंद असल्याने सात महिन्यांचे सुमारे ६५ हजार रुपये भाडे थकले होते. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटीस बजावली. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष राजू शिरोडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेत थकीत भाड्यापैकी १५ हजार रुपये भरले आणि उर्वरित रकमेसाठी १५ दिवसांची मुदत घेतली.
या घटनेला चार दिवस उलटत नाहीत तोच शुक्रवारी दुपारी महापालिकेचे ३० कर्मचाऱ्यांचे पथक सावरकर नगरमध्ये आले आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता व्यायामशाळेला थेट सील ठोकले.
---
ठाकरे समर्थक म्हणून कारवाई
ठाकरे समर्थकांवर यापूर्वीही पालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला आहे. व्यायामशाळा सील करण्याची कारवाईही अशाच प्रकारची असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे.

कारवाई योग्य
व्यायामशाळेचे भाडे थकले होते. तसेच पालिकेने दिलेल्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे, असे पालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी महेश आहेर यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97330 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..