ठाण्यात लेबर कॉन्ट्रॅक्टरवर पाचजणांचा गोळीबार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात लेबर कॉन्ट्रॅक्टरवर पाचजणांचा गोळीबार
ठाण्यात लेबर कॉन्ट्रॅक्टरवर पाचजणांचा गोळीबार

ठाण्यात लेबर कॉन्ट्रॅक्टरवर पाचजणांचा गोळीबार

sakal_logo
By

ठाणे, ता. १७ (वार्ताहर) : आपल्या कारमधून घोडबंदर रोडवर राहत्या घरी जाताना पाच जणांच्या टोळीने कारमधील गणेश कोकाटे या लेबर कॉन्ट्रॅक्टरवर एक राऊंडचा गोळीबार केल्याची घटना शनिवारी पहाटे ठाण्यात घडली. याप्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गोळीबाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे; तर अद्याप तिघा आरोपींची नावे समोर आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी चितळसर पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत असून तीन पोलिस पथके आरोपींच्या मागावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शनिवारी पहाटे गोळीबाराची घटना चितळसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोल्डन डाईज नाक्यावर घडली. आपल्या कारने फिर्यादी गणेश कोकाटे आपल्या घरी घोडबंदर रोडकडे निघाले असता रस्त्यात गोल्डन डाईज नाक्यावर दुचाकीवरून कारच्या मागे आलेल्या पाच आरोपींनी त्यांची कार अडवली आणि दोन आरोपींनी कोकाटेंच्या दिशेने एक राऊंड फायर केला. आरोपीनी गोळीबार करून घटनास्थळावरून पोबारा केला. दरम्यान या गोळीबारात गणेश कोकाटे बचावले. त्यांनी त्वरित चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. त्यानुसार चितळसर पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी आरोपी निखिल नंदकुमार यादव ऊर्फ नाक (वय ३१) राहणार लक्ष्मी चिराग नगर, यादव चाळ, ठाणे आणि अविनाश सखाराम मौर्य ऊर्फ आंबट (वय २३) राहणार कोंकणी पाडा, उपवन यांना अटक केली असून उर्वरित तिघा आरोपींची नावे अद्याप समोर आली नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

तीन पथके आरोपींच्या मागावर... ठेकेदाराच्या कॉन्ट्रॅक्टवरून गोळीबार?
===============================
ठाण्याचा विकास झपाट्याने होत असून गगनचुंबी इमारती मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे ठाण्यात अनेक टोळ्यांनी माथाडी कामगार संघटना स्थापन केल्याने कामासाठी सत्तास्पर्धा ठाण्यात सुरू आहे. गणेश कोकाटे हे लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत. याच कामाच्या वैमनस्येतून हा गोळीबाराचा प्रकार घडला असावा, असा चितळसर पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यासाठी चितळसर पोलिसांची तीन पथके त्यांच्या मागावर आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97331 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..