स्‍वच्‍छता स्पर्धेसाठी उल्हासनगर पालिका सरसावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्‍वच्‍छता स्पर्धेसाठी उल्हासनगर पालिका सरसावली
स्‍वच्‍छता स्पर्धेसाठी उल्हासनगर पालिका सरसावली

स्‍वच्‍छता स्पर्धेसाठी उल्हासनगर पालिका सरसावली

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. १८ (वार्ताहर) : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेत अव्वल येण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिका सरसावली आहे. त्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘प्लॉग रन’मध्ये अधिकारी, समाजसेवक, विद्यार्थी सहभागी झाले होते. सात हजार ५०० गुणांची ही स्पर्धा असून, देशातील ९२ शहरांनी यामध्‍ये सहभाग घेतला आहे. यंदाच्या स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत अव्वल ठरण्यासाठी किंबहुना चमकण्याकरिता अनेक शहरांमध्ये चढाओढ लागली असून त्यासाठी उल्हासनगरही सरसावल्याची माहिती आयुक्त अजिज शेख यांनी दिली.

केंद्र सरकारने पहिल्यांदाच अशा स्पर्धेचे आयोजन केले असून त्यात पहिल्या १० मध्ये येण्यासाठी उल्हासनगर महापालिकेने कंबर कसली आहे. यासाठी पालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी, नागरिक, सामाजिक संघटना प्रतिनिधी, युवक व युवतींना स्वच्छता मोहिमेत सामावून घेण्यात आले आहे. ही स्पर्धा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान आयोजित केली असून, त्यात सहभाग घेण्याकरिता पालिकेने जारी केलेल्या लिंकचा वापर करून नोंदणी करण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले आहे.
विशेष कार्यक्रम
कार्यक्रमाचा भाग म्हणून १७ सप्टेंबर रोजी आयुक्त अजिज शेख यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत ‘सेवा दिवस’ निमित्ताने शहाड स्टेशन ते बिर्ला मंदिरापर्यंत ‘प्लॉग रन’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपायुक्त (आरोग्य) डॉ. सुभाष जाधव, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार यांच्यासह सामाजिक संघटनांचे रेखा ठाकूर, शिवाजी रगडे, जगदीश तेजवानी, ज्योती तायडे, राजू तेलकर, तसेच शहरातील सामाजिक संस्था, समाजसेवक, शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक व विद्यार्थी तसेच एनएसएस विद्यार्थी उपस्थित होते. या सर्वांनी ‘प्लॉग रन’मध्ये सहभागी होऊन बिर्ला मंदिर परिसराची सफाई व स्वच्छता केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97343 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..