भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

sakal_logo
By

शहापूर, ता. १८ (बातमीदार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. याचाच एक भाग म्‍हणून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले. भारतीय जनता युवा मोर्चा शहापूर शहर आणि अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे भव्य रक्तदान शिबिर भाजपच्‍या शहापूर शहर कार्यालयात घेण्‍यात आले.
रक्तदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ९० बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. त्यामध्ये व्यापारी मंडळ शहापूर, अग्रवाल समाज शहापूर तसेच भाजप शहापूर तालुका, शहर, युवा मोर्चा, महिला मोर्चा व उत्तर भारतीय मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचा केक कापून तसेच शिबिरासाठी श्रमदान करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97345 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..