अंबरनाथमधील शिक्षकांचा सन्‍मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबरनाथमधील शिक्षकांचा सन्‍मान
अंबरनाथमधील शिक्षकांचा सन्‍मान

अंबरनाथमधील शिक्षकांचा सन्‍मान

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १९ (बातमीदार) : अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील शिक्षकांना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या वतीने कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कोरोनाच्या कठीण काळामुळे गेल्या दोन वर्षांत शिक्षक दिनी शिक्षकांचा सन्मान होऊ शकला नाही. शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, कोकण विभाग महाराष्ट्र शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते विविध शाळा- महाविद्यालयांतील ११५ शिक्षकांना गुणवंत शिक्षकांना सन्मानपत्र आणि मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी महाविद्यालयात झालेल्या समारंभाला पुढील वर्षी होणाऱ्या शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांना संधी देण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. आमदार होण्याची संधी मिळाल्यास शिक्षकांच्या मागण्या विधिमंडळात नेऊन मार्गी लावू, अशी ग्वाही ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली. आमदार किणीकर शिक्षकांची कामे करतात, त्यामुळे न्याय मिळतो, असेही म्हात्रे म्हणाले.
शिवसेना उपशहरप्रमुख परशुराम पाटील, संदीप मांजरेकर, गणेश कोतेकर, पुरुषोत्तम उगले, माजी नगराध्यक्षा सौ. प्रज्ञा बनसोडे, माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख, माजी नगरसेवक सुभाष साळुंखे, उमेश गुंजाळ, रवींद्र पाटील, तुळशीराम चौधरी, प्रमोदकुमार चौबे, युवराज पाटील, विभागप्रमुख शिक्षक सेना सचिव विजय राणे, तसेच शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहा संगणक सुपूर्द
समाज घडवण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आमदार डॉ. किणीकर आणि ज्ञानेश्वर म्हात्रे न्याय मिळवून देतील, असे आश्वासन गोपाळ लांडगे यांनी दिले. आमदार डॉ. किणीकर यांच्या विकास निधीतून महात्मा गांधी विद्यालयाकरिता देण्यात आलेले सहा संगणक महात्मा गांधी विद्यालयाचे सचिव अशोक कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97346 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..