शैक्षणिक दर्जा वाढीसह उपक्रमशील शाळा बनवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शैक्षणिक दर्जा वाढीसह उपक्रमशील शाळा बनवा
शैक्षणिक दर्जा वाढीसह उपक्रमशील शाळा बनवा

शैक्षणिक दर्जा वाढीसह उपक्रमशील शाळा बनवा

sakal_logo
By

कल्याण, ता. १८ (बातमीदार) : ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळेतील मुख्याध्यापकांकरिता नॅशनल उर्दू हायस्कूल, कल्याण येथे मार्गदर्शन सभा पार पडली. या सभेत शासन निर्णय, वेतनेतर अनुदान, एनएमएमएस शिष्यवृत्ती, सरल प्रणाली, वैद्यकीय देयके, सेवानिवृत्ती न्यायालयीन प्रकरणे; ईबीसी सवलत योजना अशा विविध विषयांवर शिक्षणाधिकारी ललिता दहिदुले यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापकांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत आहेत. आपल्याला स्पर्धेत टिकायचे असेल तर शैक्षणिक दर्जा वाढीसह विविध उपक्रम राबवायला हवेत. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांनी सीएचआर फंड जमा करून डिजिटल शाळा बनवल्या आहेत. आपणही लोकप्रतिनिधींमार्फतही शाळा बनवाव्‍यात, असेही त्‍या म्हणाल्या. कल्याण महानगरचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, सचिव अनिल पाटील, गणेश पाटील यांनी शिक्षणाधिकाऱ्यांचे स्वागत केले. उप शिक्षणाधिकारी आशा पराडके यांच्यासह २७० मुख्याध्यापक सभेला उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97349 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..