रस्ता पुन्‍हा उखडल्याने मनसेतर्फे निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ता पुन्‍हा उखडल्याने मनसेतर्फे निदर्शने
रस्ता पुन्‍हा उखडल्याने मनसेतर्फे निदर्शने

रस्ता पुन्‍हा उखडल्याने मनसेतर्फे निदर्शने

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १८ (बातमीदार) : गेल्‍या आठवड्यात गणेश चतुर्थीच्या आधी तयार करण्यात आलेला डांबरी रस्ता उखडल्याने खड्ड्यांमुळे पुन्हा रस्त्याची चाळण झाली. या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रस्त्यावर उभे राहून निदर्शने करण्यात आली. अंबरनाथच्या शिवमंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील गोविंदतीर्थ पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पुलाच्या आजूबाजूला सिमेंट काँक्रीटचा रस्ता आहे, मात्र पुलाच्या मध्य भागावर डांबरी रस्ता असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येते. याही वर्षी रस्त्यावर असंख्य खड्डे पडल्याने नागरिकांच्या तक्रारीवरून गणेश चतुर्थीच्या आधी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. डांबरीकरणासाठी लागणारी यंत्रसामग्री अद्यापही त्याचठिकाणी असताना रस्ता पूर्णपणे उखडला गेला आहे. यामुळे वाहनचालकांना आणि नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. या कारणावरून मनसेचे सचिव अविनाश सुरसे यांनी पालिकेच्या निषेधार्थ रस्त्यात काही काळ उभे राहून आंदोलन करत निषेध नोंदवला. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी बनवून खराब झालेल्या रस्त्याच्या कामाची पालिका प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी सुरसे यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97350 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..