मानवी वस्तीपासून कचरा लांब टाकावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानवी वस्तीपासून कचरा लांब टाकावा
मानवी वस्तीपासून कचरा लांब टाकावा

मानवी वस्तीपासून कचरा लांब टाकावा

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १८ (बातमीदार) : आरक्षित डम्पिंग ग्राऊंडवर शहरातील दैनंदिन कचरा नगरपालिका प्रशासन टाकत असली तरी हा कचरा नागरी वसाहतीला लागूनच असल्याने त्याला हरित लवादाने आक्षेप घेतला आहे. नियमानुसार नागरी वसाहतीपासून अंतर ठेवूनच कचरा टाकावा, अशा सूचना पालिका प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

अंबरनाथ नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडसाठी चिखलोली येथे ३२ एकर जागा देण्यात आली आहे. या डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवर कचरा न टाकता पालिका प्रशासनाने नागरी वसाहतीला लागून असलेल्या जागेत कचरा टाकण्यास सुरुवात केली होती. मोठा भूखंड असतानाही कचरा मात्र नागरी वसाहतीला लागून टाकला जात असल्याने त्याबाबत स्थानिक रहिवाशांनी हरकत नोंदवली होती. याबाबत पालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र पालिका प्रशासन कचऱ्याच्या बाबतीत कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याने स्थानिक रहिवाशांनी हरित लवादाकडे दाद मागितली होती.

हरित लवादाच्या शिष्टमंडळाने घटनास्थळाची पाहणी करून सुनावणी घेतली. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नगरपालिका यांना त्यांच्या बाजू मांडण्याच्या सूचना दिल्या होत्या. डम्पिंग ग्राऊंड सुरू करताना परवानगी घेतली गेली नाही, हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला. तसेच भूखंड डम्पिंग ग्राऊंडसाठी जागा असताना देखील कचरा एका कोपऱ्यात कचरा टाकला जात असल्याने त्यावर हरित लवादाने आक्षेप नोंदविला. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत जे नियम राखून देण्यात आले आहेत, त्यानुसार नागरी वसाहतीपासून काही अंतर राखून कचरा टाकावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

निधीअभावी प्रकल्प रखडला
डम्पिंग ग्राऊंडबाबत पर्यायी जागा नसल्याने हरित लवादाने आहे त्या भूखंडावरच योग्य पद्धतीने कचरा टाकण्याचे आणि त्यावर प्रक्रिया करण्याच्या सूचना दिल्या. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांचा मिळून संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तयार करण्यात आला असून त्या प्रकल्पाला अद्याप निधीची तरतूद न झाल्याने हा प्रकल्प रखडून पडला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97351 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..