दसरा मेळाव्याची दिघ्यात रणनिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दसरा मेळाव्याची दिघ्यात रणनिती
दसरा मेळाव्याची दिघ्यात रणनिती

दसरा मेळाव्याची दिघ्यात रणनिती

sakal_logo
By

वाशी, ता. १८ (बातमीदार) ः राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गट यांच्यातील वाद अधिकच शिगेला पोहचला आहे. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरच दसरा मेळावा करण्याचा ठाम निर्धार केला आहे; तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दसरा मेळाव्यासाठी तयारी सुरू केली असून दिघा परिसरातील शिंदे गटातील माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी ऐरोलीतील एका सभागृहात आढावा बैठक घेत दिघा, रबाळे परिसरातून हजारोंच्या संख्येने
उपस्थित राहण्याचा निर्धार केला आहे.
नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या रुपाने आपल्याला हक्काचा माणूस मुख्यमंत्री लाभला असल्याचे मत विजय चौगुले यांनी व्यक्त केले. काही दिवसांपासून शिंदे यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयातून त्याचा प्रत्यय येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीने शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री असा प्रवास करत हे यश गाठले असल्याने त्यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी दिघा विभागातील कार्यकर्त्यांनी दसरा मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. या बैठकीला माजी नगरसेवक किशोर गायकर, माजी नगरसेवक जगदीश गवते, माजी नगरसेवक बहादूर बिष्ट, माजी नगरसेवक रामआशीष यादव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97356 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..