भाडे थकवल्याने एकाला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाडे थकवल्याने एकाला मारहाण
भाडे थकवल्याने एकाला मारहाण

भाडे थकवल्याने एकाला मारहाण

sakal_logo
By

नवी मुंबई (वार्ताहर) : रुमचे भाडे वेळेवर न दिल्याच्या रागातून घरमालक असलेल्या पिता-पुत्रांनी भाडोत्रीला शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार नेरूळमध्ये घडला आहे. याप्रकरणी नेरूळ पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल आहे.
तुर्भे गाव येथील नवी मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सिद्धार्थ साळवे (३९) यांनी दारावे गाव सेक्टर-२३ मधील सिद्धेश्वर कृपा अपार्टमेंटमध्ये राहत आहेत. ऑगस्ट २०१९ मध्ये साळवे यांनी शशिकांत म्हात्रे यांचे घर भाड्याने घेतले होते. दर महिन्याला साळवे पुढील महिन्याचे भाडे शशिकांत म्हात्रे यांना देत होते. मात्र, ऑगस्ट महिन्यामध्ये साळवे यांना आर्थिक अडचणीमुळे आगाऊ भाडे देता आले नाही. त्यामुळे १० सफ्टेंबर रोजी त्यांनी म्हात्रे यांना गुगल पेद्वारे ऑगस्ट महिन्याचे भाडे पाठवून दिले होते. पण या गोष्टीचा राग आल्याने म्हात्रे यांनी साळवे यांना संपर्क साधून एकच महिन्याचे भाडे दिल्याबाबत जाब विचारला. तसेच भाडे देण्यास उशीर केल्याने साळवे यांना शिवीगाळ आणि मारहाण केली होती. या प्रकरणी नेरूळ पोलिस ठाण्यात प्रकार दाखल झाल्यानंतर रुम मालक शशिकांत व साईप्रसाद म्हात्रे या पिता-पुत्रांविरोधात मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणी विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97357 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..