पाणीटंचाईतून मुक्ती दृष्टीपथात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणीटंचाईतून मुक्ती दृष्टीपथात
पाणीटंचाईतून मुक्ती दृष्टीपथात

पाणीटंचाईतून मुक्ती दृष्टीपथात

sakal_logo
By

वाशी, ता. १८ (बातमीदार) ः कोकण किनारपट्टीत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोरबे धरण क्षेत्रात देखील पाणीपातळीत वाढ होत आहे. १७ सप्टेंबरपर्यंत धरणातील पाणी पातळी ९४.६८ टक्क्यांवर गेली असून ऑगस्ट २०२३ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्याने नवी मुंबईकरांची पाणीटंचाईतून सुटका झाली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणात जुलै महिन्याचा दुसरा आठवडापर्यंत निम्माच पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा नवी मुंबईत पाणीकपात करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली होती; पण जुलै तसेच सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. १२ जुलैला मोरबे धरणात अवघा ४२ टक्के पाणीसाठा होता. मात्र, सद्यस्थितीत त्यात सुधारणा होऊन ९४.६८ टक्के पाणीसाठा झाला आहे. तसेच पुढील काळात पाऊस असाच सुरू राहिल्यास आठवडाभरात धरण पूर्णक्षमतेने भरण्याची शक्यता आहे. सध्या मोरबे धरणातून शहराला पाणीपुरवठ्यासाठी प्रतिदिन ४२० एमएलडी पाणी वापरले जाते. त्यातून नवी मुंबईसह कामोठे व मोरबे परिसरातील सात गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.

लवकरच धरण भरण्याची शक्यता
मोरबे धरणाची पातळी ८८ मीटरला पूर्ण भरते. तेव्हा १९०.८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा होतो. सन २०१८ मध्ये २५ जुलै रोजी, तर सन २०१९ मध्ये ४ ऑगस्टमध्येच धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. सन २०२० मध्ये पाऊस लांबल्याने ९५ टक्के धरण भरले होते. सन २०२१ मध्ये देखील धरण काठोकाठ भरले होते. पण सुरू असलेल्या पावसामुळे धरण लवकरच भरण्याची शक्यता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97359 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..