शिवडीत आरोग्य शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवडीत आरोग्य शिबिर
शिवडीत आरोग्य शिबिर

शिवडीत आरोग्य शिबिर

sakal_logo
By

शिवडी, ता. १८ (बातमीदार) ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी शिवडी विधानसभा, वॉर्ड क्रमांक २०५ आणि अस्तित्व आधार फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. १७) आरोग्य शिबिर राबवण्यात आले. वॉर्ड अध्यक्ष गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्युदय नगरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी महिला वॉर्ड अध्यक्ष जान्हवी राणे, युवा वॉर्ड अध्यक्ष सिद्धेश वाकडे उपस्थित होते. यात मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी, हाडांची तपासणी, नेत्र तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या. शिबिरात विशेष मार्गदर्शक म्हणून डॉ. आकाश भटजीरे, डॉ. प्रगजी वाझा, डॉ. वैशाली शेलार, न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स, शिबिर कोओर्डीनेटर संजय कचरे यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97367 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..