कॉनव्हेन्ट गर्लस्‌ हायस्कूलची ‘निसर्ग पार्क सफारी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉनव्हेन्ट गर्लस्‌ हायस्कूलची ‘निसर्ग पार्क सफारी’
कॉनव्हेन्ट गर्लस्‌ हायस्कूलची ‘निसर्ग पार्क सफारी’

कॉनव्हेन्ट गर्लस्‌ हायस्कूलची ‘निसर्ग पार्क सफारी’

sakal_logo
By

प्रभादेवी, ता. १८ (बातमीदार) : विद्यार्थिनींनी निसर्ग सफारी करत महाराष्ट्र निसर्ग पार्कमधील अनेक औषधी वनस्पतींची माहिती त्याचप्रमाणे फुलपाखरांच्या प्रजाती, त्यांचे गुणधर्म जाणून घेत निरीक्षणाच्या नोंदी घेतल्या. प्रभादेवी येथील कॉन्व्हेन्ट गर्लस्‌ हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना पर्यावरणाची, निसर्गाची माहिती मिळावी, यासाठी थेट माहीम येथील महाराष्ट्र निसर्ग पार्क सफारीचे आयोजन केले होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर आशा अल्मेडा यांच्या मार्गदर्शनाखली आयोजित केलेल्या सफारीत विद्यार्थिनींनी निसर्ग न्याहाळत निरीक्षणाच्या नोंदी वहीत लिहून घेतल्या. आवळा, कडुलिंबू, शतावरी, मुरुडशेंग, खैर, पानवेल, ब्राह्मी, काटेसावर अशा अनेक प्रकारच्या गुणधर्मी औषधी वनस्पती व त्यामुळे मानवाला होणारा फायदा याचे महत्त्‍व त्‍यांनी जाणून घेतले; तर ब्लू टायगर, कॉमन क्रो, मॉनमॉर्न, ग्रेट ऑरेंज फुलपाखरू अशा विविध फुलपाखरांच्या प्रजातीही जवळून अभ्‍यासल्‍या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97369 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..