सतत पडणाऱ्या पावसामुळे भातशेती धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सतत पडणाऱ्या पावसामुळे भातशेती धोक्यात
सतत पडणाऱ्या पावसामुळे भातशेती धोक्यात

सतत पडणाऱ्या पावसामुळे भातशेती धोक्यात

sakal_logo
By

किन्‍हवली, ता. १८ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात खरीप हंगामात सर्वात जास्त भाताचे पीक घेतले जाते. आतापर्यंत पडणारा सततचा पाऊस अजून तरी भातपिकासाठी समाधानकारक आहे, परंतु यापुढे असाच पाऊस पडत राहिला तर निसवण प्रक्रियेत असलेल्या भात रोपांचा फुलोरा गळण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
वीस दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसाचा जोर आठवडाभरापासून अधिकच वाढला आहे. तयार झालेले भाताचे कणीस बाहेर पडण्याच्या स्थितीत असताना सततच्या पावसामुळे फुलोरा गळून पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्याच्या परिस्थितीत भात शेती करणे जिकीरीचे असतानाही कर्जबाजारी होऊन नाईलाजाने शेती कसावी लागते आहे. राबणी, पेरणी, उखळण, लावणी, बेनणी, कापणी, झोडणी, मळणी, खते, औषधे, मजुरी यासाठी अतोनात खर्च झाल्यानंतर भात पीक हाती लागेलच याची शाश्‍‍वती नसतानाही शेतजमीन ओसाड जाऊ नये म्हणून शेतकरी राबत असतो.
शहापूर तालुक्यात १४ हजार ५०० हेक्‍टर क्षेत्रामध्ये भाताचे उत्पन्न घेतले जाते. विविध भाताच्या वाणांची लागवड येथे केली जाते. मागील दोन वर्षांपासून अस्मानी संकटाचा सामना केलेल्या शेतकऱ्याला यंदा दर्जेदार भातपीक हाती येईल, अशी आशा असतानाच आता सततच्या मुसळधार पावसामुळे भातशेती संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.
----------------------------------
सध्या पडत असलेल्या पावसामुळे येणाऱ्या भात पिकाचे नुकसान होऊ शकते. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सडलेल्या व निर्जीव झालेल्या भाताच्या काड्या काढून टाकाव्यात.
- सारिका शेलार,
प्रभारी अधिकारी, ठाणे कृषी विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97371 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..