विक्रमगडमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगडमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बैठक
विक्रमगडमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बैठक

विक्रमगडमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बैठक

sakal_logo
By

विक्रमगड, ता. १८ (बातमीदार) : तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नुकतीच आमदार सुनील भुसारा यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी भुसारा म्हणाले, या बैठकीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विक्रमगडचा गड राष्ट्रवादीच जिंकेल हे कार्यकर्त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. तसेच बैठकीचे आयोजन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचेही त्यांनी कौतुक केले.
पालघर जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आमदार सुनील भुसारा हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आमदार भुसारा यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या वेळी विक्रमगड तालुक्यातील विविध पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार सुनील भुसारा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. तसेच साखरे ग्रामपंचायतीमधील हनुमान पाडा, ग्रामपंचायत घाणेकर, कोकणीपाडा, डोल्हारी ग्रामपंचायतीमधील महिला आणि युवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या बैठकीला तालुका प्रमुख ज्ञानेश्वर सांबरे, सभापती रुचीता कोरडा, कार्याध्यक्ष रमण कोरडा, कार्याध्यक्ष रमेश दोडे, राहुल धूम, संघटक विजय औसरकर, तालुका युवक अध्यक्ष भरत भोये, शहराध्यक्ष यादव गभाले यांच्यासह पदाधिकारी युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97373 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..