परिवहन सेवेचे धोरण अखेर ठरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परिवहन सेवेचे धोरण अखेर ठरले
परिवहन सेवेचे धोरण अखेर ठरले

परिवहन सेवेचे धोरण अखेर ठरले

sakal_logo
By

भाईंदर, ता. १८ (बातमीदार) : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेले मिरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेचे धोरण अखेर निश्चित झाले आहे. या सेवेतील बस यापुढे जीसीसी तत्त्वावर चालवण्याचा निर्णय आयुक्त दिलीप ढोले यांनी घेतला आहे.
परिवहन सेवेतील सध्याच्या बस एनसीसी तत्त्वावर चालत आहेत. मात्र लवकरच या ताफ्यात ३० ई-बसचा समावेश होणार आहे. या दोन्ही प्रकारच्या बस चालविण्यासाठी कंत्राटदाराची नव्याने नेमणूक करायची असल्याने यासंदर्भातले धोरण ठरविण्यासाठी प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी महासभेपुढे प्रस्ताव दिला होता. या दोन्ही प्रकारच्या बस जीसीसी तत्त्वावर चालविण्यात याव्यात, असे प्रशासनाचे मत होते. पण महासभेने ई-बस जीसीसी तत्त्वावर व उर्वरित बस एनसीसी तत्त्वावर चालवाव्यात, असा निर्णय बहुमताच्या जोरावर घेतला होता.
मात्र या निर्णयामुळे अडचण निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे आयुक्तांनी हा निर्णय स्वीकारला नव्हता. जीसीसी तत्त्वावरील ई-बस व एनसीसी तत्त्वावरील साधी बस एकाच मार्गवार धावत असेल, तर त्यासाठी दोन स्वतंत्र कंत्राटदारांना स्वतंत्र धोरणानुसार देयक दिले तर वाद निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे दोन्ही पद्धतीच्या बस जीसीसी या एकाच धोरणानुसार चालविण्याचा निर्णय आयुक्त दिलीप ढोले यांनी प्रशासक या नात्याने स्वत:च्या अधिकारात नुकताच घेतला आहे. यातील महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या ई-बस नियुक्त होणारा कंत्राटदार स्वत: खरेदी करणार असून त्यासाठी महापालिकेकडून त्याला अनुदान देण्यात येणार आहे. आता लवकरच कंत्राटदार नेमण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे.
.......
काय आहे जीसीसी व एनसीसी धोरण
१ जीसीसी पद्धतीत रस्त्यावर धावणाऱ्या बसद्वारे मिळणारे प्रवासी भाडे महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे. या बदल्यात महापालिका निविदेत निश्चित केलेल्या दरानुसार प्रतिकिमी कंत्राटदाराला पैसे देणार आहे.
२ सध्या सुरू असलेल्या एनसीसी पद्धतीत तिकिटाद्वारे जमा होणारे पैसे कंत्राटदाराकडे जातात व उत्पन्न व खर्च यातील फरकाची रक्कम महापालिका कंत्राटदाराला अदा करते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97377 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..