मराठवाडा मित्र मंडळाचा विरार मध्ये परिचय मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठवाडा मित्र मंडळाचा विरार मध्ये परिचय मेळावा
मराठवाडा मित्र मंडळाचा विरार मध्ये परिचय मेळावा

मराठवाडा मित्र मंडळाचा विरार मध्ये परिचय मेळावा

sakal_logo
By

नालासोपारा, ता. १८ (बातमीदार) : मराठवाड्यातील परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यातून कामानिमित्त पालघरसह मुंबई शहरात स्थिरावलेल्या नागरिकांचा पहिला परिचय मेळावा शनिवारी विरारमध्ये पार पडला. या मेळाव्यात शासकीय, निमशासकीय क्षेत्रातील कर्मचारी अधिकारी यांच्यासह डॉक्टर, वकील, पत्रकार, व्यावसायिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणारे सर्व नागरिक सहभागी झाले होते.
धोंडिबा मुंढे, एकनाथ सोनवणे, विनायक चौले, डॉ. श्याम कुलकर्णी यांच्या पुढाकारातून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विरार पश्चिम यशवंत सूत टॉवरमधील ओडीआरएल लॅबच्या हॉलमध्ये मराठवाडा मित्रमंडळ आयोजित परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते. मराठवाड्यातील अनेक नागरिक हे कामानिमित्त मुंबई, पालघर, वसई, विरार, नालासोपारा, ठाणे या परिसरात वेगवेगळ्या क्षेत्रांत स्थिरावले आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याच जवळचे पण आपणालाच माहीत नसतात. सुख- दुःखात जवळ असून पण त्यांना मदत करता येत नाही, त्यामुळे या सर्वांना एकत्र आणत मराठवाडा मित्र मंडळाच्या माध्यमातून एकजूट बांधावी, अशी प्रतिक्रिया यावेळी सहभागी झालेल्या सर्वांनी दिल्या आहेत. मराठवाड्यातील पहिला परिचय मेळाव्यानंतर आता लवकरच आणखी एक बैठक घेऊन, मराठवाडा मित्र मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे, असे संयोजकांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97391 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..