वाड्यात पंतप्रधान मोदींच्या जीवनावर प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाड्यात पंतप्रधान मोदींच्या जीवनावर प्रदर्शन
वाड्यात पंतप्रधान मोदींच्या जीवनावर प्रदर्शन

वाड्यात पंतप्रधान मोदींच्या जीवनावर प्रदर्शन

sakal_logo
By

वाडा, ता. १८ (बातमीदार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील प्रदर्शन जिल्हा भाजप कार्यालयात शनिवारी तालुका शाखेच्या वतीने भरवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वाड्यात जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात शनिवारी त्यांच्या जीवनावरील कार्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून हे प्रदर्शन १९ सप्टेंबरपर्यंत खुले असणार आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन ठाणे ग्रामीणचे प्रभारी बाबाजी काठोळे व जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले; तर या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. हेमंत सवरा, जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे, युवामोर्चा पालघर जिल्हाध्यक्ष समीर पाटील, सुशील औसरकर, मधुकर खुताडे, जि.प.सदस्य संदीप पावडे, तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, युवामोर्चा सरचिटणीस कुणाल साळवी, तालुका सरचिटणीस रोहन पाटील, राजेश रिकामे,कांतीलाल गोरे, हर्षल खांबेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97396 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..