‘जीवनगणी’ने साहित्य जलोषचा समारोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘जीवनगणी’ने साहित्य जलोषचा समारोप
‘जीवनगणी’ने साहित्य जलोषचा समारोप

‘जीवनगणी’ने साहित्य जलोषचा समारोप

sakal_logo
By

विरार, ता. १८ (बातमीदार) : शांता शेळके, वसंत बापट, अण्णा भाऊ साठे व शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कवितांवरील आधारित ‘जीवनगाणी’ कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हा कार्यक्रम प्रसाद महाडकर आणि त्यांच्या साथीदारांनी सादर केला.
सभागृहाबाहेर कोसळणारा पाऊस आणि सभागृहामध्ये प्रतिभा त्रयी यांच्या गाण्यांची मैफल चांगलीच रंगत गेली. ‘गगन सदन तेजोमय’ या वसंत बापट यांच्या प्रार्थनेने गायिका अपूर्वा पेंढारकर यांनी सुरुवात केली. त्यानंतर शांताबाई शेळके यांचे ‘मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश’ हे गाणे सोनाली कर्णिक यांनी सादर केले. अनिरुद्ध जोशी यांनी ‘तोच चंद्रमा नभात’ सादर केले. ‘हा माझा मार्ग एकला’ हे गाणे श्रीरंग भावे यांनी सादर केले, तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवरील अण्णा भाऊ साठे यांची ‘माझी मैना गावाकडे राहिली’ ही फक्कड दत्ता मेस्त्री यांनी सादर केली. त्याला रसिकांनी वन्स मोर दिल्याने काही काळ सभागृहातील वातावरण भारावले. त्यानंतर अनेक गाण्यांच्या सरी सभागृहात कोसळतच राहिल्या, गाण्यांच्या या मैफलीत कधी ‘येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील’ , ‘मी डोलकर दर्याचा राजा’, तर कधी शांताबाईंच्या कोकणी गीतांची मेजवानी रसिकांना मिळाली. मध्येच कधी ‘काटा रुते कुणाला’ हे अनिरुद्ध जोशीने गायलेले गीत भाव खाऊन गेले. मग शिट्ट्या, टाळ्यांच्या आणि ढोलकीच्या तालावर सोनाली कर्णिकने सादर केलेली लावणी वन्स मोर घेऊन गेली. शेवटी भावनात्मक साद घालणाऱ्या अनिरुद्ध जोशी यांनी गायलेल्या ‘असेन मी नसेन मी’ या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे निवेदन स्मिता गव्हाणकर व कुणाल रेगे यांनी, तर मकरंद सावे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97404 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..