युवकांचा ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर’चा नारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवकांचा ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर’चा नारा
युवकांचा ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर’चा नारा

युवकांचा ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर’चा नारा

sakal_logo
By

वसई, ता. १८ (बातमीदार) : पावसाची पर्वा न करता सागरी किनारा स्वच्छ करण्यासाठी युवकांनी अर्नाळा समुद्रकिनारी धाव घेतली. येथे जमा झालेला कचरा उचलत त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या वेळी स्वच्छ सागर, सुरक्षित सागर नारा युवकांनी दिला. समुद्रात होणारे प्रदूषण व त्याचा जलचर प्राण्यांवर होणारा परिणाम पाहता जलप्रदूषण रोखा, असा संदेश देण्यात आला.
अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मुंबईसह ठाणे व आजूबाजूच्या परिसरातून पर्यटकांची गर्दी नेहमीच असते. शनिवार व रविवारी या ठिकाणी पर्यटकांचे उधाण असते. मात्र समुद्राच्या किनाऱ्याला प्लास्टिक पिशव्या, खाद्यपदार्थांचे वेष्टण, प्लास्टिक बाटल्या, काचेच्या बाटल्या यासह अन्य कचरा पडलेला असतो. यामुळे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरते. यामुळे स्वच्छतेला प्राधान्य देत, तट सागरी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या वेळी सदस्यांनी किनाऱ्यावरील विविध जैविक कचरा एकत्र जमा केला व तो पिशवीत भरून ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाहेर काढून त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यात आली. या वेळी पंचायत समिती सभापती वनिता तांडेल, अर्नाळा ग्रामपंचायत सरपंच हेमलता बाळशी, उपसरपंच महेंद्र पाटील व कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी तसेच ‘मी जागृत बंदरपाडेकर परिवारा’चे सदस्य आदींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
जलप्रदूषण रोखा, जलचर प्राण्यांना जगण्याचा हक्क द्या, सागरकिनाऱ्यांचे संवर्धन करा व मोकळा श्वास प्रत्येकाला घेऊ द्या, असे आवाहन मी जागृत बंदरपाडेकर परिवाराचे अध्यक्ष निनाद पाटील यांनी नागरिकांना केले.
---------------------------
अविघटनशील कचऱ्याचे प्रमाण अधिक
समुद्रकिनाऱ्यावरून गोळा करण्यात आलेल्या कचऱ्यामध्ये अविघटनशील कचऱ्याचे प्रमाण अधिक होते. एकीकडे प्लास्टिक, थर्माकॉल बंदी असताना किनाऱ्यावर मात्र या गोष्टींचा खच होता; तर समुद्रातून वाहून येणारा कचरा नेहमीच किनारा अस्वच्छ करत आहे. त्यामुळे नागरिकांनी सजग होत समुद्रात अशा वस्तू फेकणे किंवा किनाऱ्यावर टाकणे बंद केले, तरच समुद्र व किनारे स्वच्छ ठेवण्यास हातभार लागणार आहे.
------------------------
वसई : अर्नाळा सागरी किनाऱ्यावर जमा झालेला कचऱ्याचा ढीग.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97405 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..