अखेरचा निरोपही वेदनादायी ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेरचा निरोपही वेदनादायी !
अखेरचा निरोपही वेदनादायी !

अखेरचा निरोपही वेदनादायी !

sakal_logo
By

दिलीप पाटील : सकाळ वृत्तसेवा
वाडा, ता. १८ : तालुक्यातील मुसारणे ग्रामपंचायत हद्दीतील घोडविंदे पाडा येथे एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. गावात जाणारा पूल पाण्याखाली गेल्याने, तसेच पर्यायी मार्गाने रुग्णवाहिका गावात नेणे शक्य नसल्याने नातेवाइकांनी मृतदेह झोळीतून भर पावसामध्ये चिखल तुडवत एक किलोमीटर पायी प्रवास करत आपल्या घरी घेऊन गेले.
घोडविंदे पाडा गावातील पंढरीनाथ पाटील (वय ६४) यांचे अल्पशा आजाराने रुग्णालयामध्ये शुक्रवारी निधन झाले होते; पण त्यांचा मृतदेह अंतिम विधी करण्यासाठी त्यांचे नातेवाईक आपल्या घरी रात्रीच्या सुमारास घेऊन जात असताना गावात जाण्यासाठी असलेला कमी उंचीचा साकव पावसामुळे पाण्याखाली गेला. त्यामुळे नाइलाजाने त्या मृत व्यक्तीचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी पर्यायी मार्ग वापरत दुसऱ्या गावातून मृतदेह घरी नेण्याचा प्रयत्न केला; पण तेथूनही रुग्णवाहिका जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्या व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या नातेवाइकांनी रुग्णवाहिकेमधून बाहेर काढत भर पावसामध्ये चिखल तुडवत एक किलोमीटर पायी प्रवास करत आपल्या घरी घेऊन गेले. गावात गेल्यानंतर अंतिम विधी करण्यासाठी स्मशानभूमी नसल्याने भरपावसात अंत्यविधी करावा लागला.

.....
ना स्मशानभूमी ना चांगला रस्ता
आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला; परंतु मुसारणे ग्रामपंचायत हद्दीतील घोडविंदे पाडा हा भिवंडी-वाडा या महामार्गालगत असूनही विकासापासून दूर आहे, ही मोठी शोकांतिका आहे. या गावात जाण्यासाठी चांगला रास्ता नाही, तसेच गावात स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना उघड्यावरच अत्यसंस्कार करावे लागत आहेत.
...
अनेक वर्षांपासून नवीन पुलाची मागणी गावातील नागरिक करत आहेत; परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग निधी नाही म्हणून केराची टोपली दाखवत आहे. आता या समस्येबद्दल लवकरात लवकर जनआंदोलन उभारण्यात येईल.
- जयेश घोडविंदे, अध्यक्ष, संवाद सामाजिक संस्था

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97408 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..