सेवा पंधरवड्यानिमित्ताने भिवंडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवा पंधरवड्यानिमित्ताने भिवंडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
सेवा पंधरवड्यानिमित्ताने भिवंडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

सेवा पंधरवड्यानिमित्ताने भिवंडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

sakal_logo
By

भिवंडी (बातमीदार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान भाजपच्या वतीने सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने भिवंडी शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भिवंडी शहर जिल्हा भाजपच्या वतीने आमदार महेश चौघुले यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पाटीदार हॉल, गोपालनगर येथे बुद्धिजीवी संमेलन मार्गदर्शन सभा आयोजित केली होती. ॲड. वैभव भोईर यांनी रक्तदान शिबिर; तर युवा मोर्चा अध्यक्ष राजू चौघुले यांनी मोदी यांच्या जीवनावर चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले होते. तसेच केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, संतोष शेट्टी, आमदार महेश चौघुले, उत्तर भारतीय व्यापारी आघाडी अध्यक्ष उदयराज सिंग यांनी क्षयरोगग्रस्त व्यक्तींना एक वर्षासाठी दत्तक घेतले आहे. या वेळी संघटन महासचिव ॲड. हर्षल पाटील, विशाल पाठारे, सुगंधा टावरे, निखिल चव्हाण, रेखा पाटील, निर्मला टावरे, दक्षिण भारतीय आघाडी ठाणे-पालघर संयोजक कोंका मल्लेशम आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97413 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..