आत्महत्येचा टोकाचे पाउल उचलणाऱ्या २१ जणांना नवीदिशा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आत्महत्येचा टोकाचे पाउल उचलणाऱ्या २१ जणांना नवीदिशा
आत्महत्येचा टोकाचे पाउल उचलणाऱ्या २१ जणांना नवीदिशा

आत्महत्येचा टोकाचे पाउल उचलणाऱ्या २१ जणांना नवीदिशा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १८ : आधी नैराश्य... त्यानंतर मानसिकदृष्ट्या खचणे... हळूहळू आपल्या जीवलगांशी संवाद तुटतो आणि गळ्यात मृत्यूचा फास बसतो. आत्महत्या हा खरंतर पूर्णपणे मानसिक आजार असून त्यावर उपचार आहे. याच नैराश्यातून अनेक जण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असतात. मागील पाच महिन्यांत अशा २१ जणांचे समुपदेशन करून त्यांना मृत्यूच्या वाटेवरून अलगद जगण्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम जिल्हा सामान्य रुग्णालयातील मानसोपचार तज्‍ज्ञांनी केले आहे. विशेष म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये पुरुषांची संख्या अधिक असल्याची बाब समोर आली आहे.

सध्याच्या घडीला बदलती जीवनशैली, स्पर्धात्मक युग यांच्या गर्तेत माणूस अडकत चालला आहे. त्यातच एखाद्या व्यक्तीला तो नोकरी करत असलेल्या ठिकाणी वरिष्ठांकडून अपमानजनक शब्द उच्‍चारला, प्रेमभंग झाला तर माणूस हा मानसिक ताणतणावाखाली वावरत असतो. या ताणतणावाखाली वावरत असतानाच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलतो. अशाच ताणतणावाला कंटाळून आत्महत्येचे प्रयत्न केलेले रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयातदेखील उपचारार्थ दाखल होत असतात. तेथे त्यांच्यावर उपचार करून त्यांचे प्राण वाचविण्यात येते. नैराश्यातून आत्महत्येकडे वळताना होणाऱ्या मानसिक बदलांना एकाचवेळी समुपदेशन आणि औषधे देऊन त्यांना परावृत्त करता येते.

रुग्णांचे समुपदेशन
एप्रिल ते ऑगस्ट २०२२ या पाच महिन्यांच्या कालावधीत २१ रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. यामध्ये १३ पुरुष, तर आठ महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अशा रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील मानसोपचारतज्‍ज्ञ डॉ. सुवर्णा माने व समाजसेवा अधीक्षक मनोविकृत श्रीरंग सिद, शर्मिला पठारे, सामाजिक कार्यकर्ते स्मिता भोसले हे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या रुग्णांचे समुपदेशन करून त्यांना आशेचा नवीन किरण दाखवीत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यक्रम
१० सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तो साजरा होऊ शकला नाही. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येताच या दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एका कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालयात केले होते. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णलयातील समाज सेवा अधीक्षक मनोविकृती श्रीरंग सिद यांनी, माणसाच्या मेंदूतील रासायनिक बदल झाल्यामुळे तसेच सामाजिक उपक्रमात मनमोकळेपणाने वावर नसल्यामुळे, संवादाचा अभाव झाल्यास माणसे आपल्या मनातील दुःखे कोणाला बोलू शकत नाही, त्यामुळे त्यांच्यावर न कळत ताणतणाव निर्माण होतो. त्याच नैराश्यातून आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल चालले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97418 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..