विद्यार्थ्यांनी केली जंजीरे धारावी किल्ल्याची स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांनी केली जंजीरे धारावी किल्ल्याची स्वच्छता
विद्यार्थ्यांनी केली जंजीरे धारावी किल्ल्याची स्वच्छता

विद्यार्थ्यांनी केली जंजीरे धारावी किल्ल्याची स्वच्छता

sakal_logo
By

भाईंदर, ता. १८ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेने आयोजित केलेल्या स्वच्छता लीग रॅलीत सहभागी होत चौक येथील सेंट अँड्र्यूज इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जंजिरे धारावी किल्ल्याची स्वच्छता केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. मिरा-भाईंदर महापालिकेने यानिमित्त स्वच्छता लीग रॅलीचे आयोजन केले आहे. अभिनेत्री मुग्धा गोडसे व अभिनेता राहुल देव यांच्या हस्ते शनिवारी या रॅलीची सुरुवात करण्यात आली.
शहर स्वच्छतेसोबतच महापालिकेकडून ऐतिहासिक स्थळांची स्वच्छतादेखील केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून नरवीर चिमाजी अप्पांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या चौक येथील जंजिरे धारावी किल्ल्याचीदेखील स्वच्छता केली जात आहे. चौक येथील सेंट अँड्र्यूज स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक व स्थानिक नगरसेविका हेलन गोविंद यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ला परिसराची स्वच्छता केली. या किल्ल्याच्या सुशोभीकरणाचा आराखडा पर्यटन विभागाने तयार केला आहे. तोपर्यंत महापालिका व इतिहासप्रेमींकडून किल्ल्याची स्वच्छता केली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97424 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..