स्वाइन फ्‍ल्‍यूचा प्रादुर्भाव आटोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वाइन फ्‍ल्‍यूचा प्रादुर्भाव आटोक्यात
स्वाइन फ्‍ल्‍यूचा प्रादुर्भाव आटोक्यात

स्वाइन फ्‍ल्‍यूचा प्रादुर्भाव आटोक्यात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १८ : ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात मागील अनेक दिवसांपासून थैमान घालणाऱ्या स्वाईन फ्ल्‍यू या आजाराचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी जिल्ह्यात स्वाईन फ्ल्‍यूचा एकही नवीन रुग्ण नोंद करण्यात आला नाही. दुसरीकडे जिल्ह्यात आढळून आलेल्या ५३२ रुग्णांपैकी ४४४ रुग्‍णांवर यशस्वी उपचार करून ठणठणीत होऊन घरी परतल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात स्वाईन फ्ल्‍यूचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असला तरी, साथीच्या आजारांनी मात्र डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यात ठाणे जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून स्वाईन फ्ल्‍यूचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली. यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्याखालोखाल कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई या शहरांत रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णसंख्येसह मृत्यूच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, यामुळे जिल्ह्याची आरोग्य चिंता वाढली आहे. जिल्ह्यात स्वाईन फ्ल्‍यूमुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये सहव्याधी आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात स्वाईन फ्ल्‍यूने बाधित रुग्णांची संख्या ५३२ वर, तर या आजाराने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या १५ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आढळून आलेल्या ५३२ रुग्णांपैकी ४४४ रुग्णांवर यशस्वी उपचार करून ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. अवघ्या ७७ रुग्णांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. घटत्या आकडेवारीमुळे जिल्ह्यात स्वाईन फ्ल्‍यूचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
आरोग्य यंत्रणांनी सोडला सुटकेचा निःश्वास
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून वाढत्या स्वाईन फ्ल्‍यूच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विभागावर ताण निर्माण होत असताना, शनिवारी (१७ सप्टेंबर) जिल्ह्यातील सहा महापालिकांसह ग्रामीण भागात एकही स्वाईन फ्ल्‍यूचा रुग्ण आढळून आला नसून एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

--

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97427 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..