भर पावसात म्हाडा लाभार्थ्यांची निदर्शेने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भर पावसात म्हाडा लाभार्थ्यांची निदर्शेने
भर पावसात म्हाडा लाभार्थ्यांची निदर्शेने

भर पावसात म्हाडा लाभार्थ्यांची निदर्शेने

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. १८ : घरे मिळण्याची मुदत उलटूनही घरांचा ताबा न मिळाल्याने शिरढोण येथील म्हाडा लाभार्थी संतप्त झाले आहेत. रविवारी भर पावसात संतप्त लाभार्थ्यांनी एकत्र येत निदर्शने केली. यावेळी म्हाडा विरोधात घोषणाबाजी करत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

कल्याण ग्रामीण परिसरात खोणी-शिरढोण येथे मोठ्या प्रमाणात म्हाडाच्या गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यातील शिरढोण गावात म्हाडा गृहसंकुल प्रकल्प असून यामध्ये २०१८ मध्ये १ हजार ९०५ जणांना घरांची लॉटरी लागली होती. घरांचे पैसे भरले, बॅंकांचे कर्ज देखील फिटत आले, तरी अद्याप घरांचा ताबा या लाभार्थ्यांना मिळालेला नाही. खोणीप्रमाणेच शिरढोण प्रकल्पातील लाभार्थ्यांची हीच अवस्था आहे. घरांची लॉटरी लागल्यानंतर प्रशासनाला द्यावयाचे पैसे सर्वसामान्य लाभार्थ्यांनी पूर्ण भरल्यानंतरदेखील अद्यापपर्यंत त्यांना घरांचा ताबा मिळालेला नाही. म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून यावर कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नसल्याने लाभार्थी त्रासले आहेत.
म्हाडाकडून दिलेल्या मुदतीत घरे दिली जात नसतील तर आम्हाला शेवटचा हप्ता परत करावा किंवा आमच्याकडून घेण्यात आलेल्या घरांच्या किमतींवर व्याजासह पैसे द्यावेत, अशी मागणी यावेळी लाभार्थ्यांनी केली. यावेळी समाजसेवक आनंद फुलोरे यांना याची माहिती मिळताच त्यांनी लाभार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेत यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ही समस्या निकाली लावण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97439 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..