बँकेचे कर्ज चुकवण्यासाठी वाहनावर लावले बनावट नंबरप्लेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बँकेचे कर्ज चुकवण्यासाठी वाहनावर लावले बनावट नंबरप्लेट
बँकेचे कर्ज चुकवण्यासाठी वाहनावर लावले बनावट नंबरप्लेट

बँकेचे कर्ज चुकवण्यासाठी वाहनावर लावले बनावट नंबरप्लेट

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १८ (वार्ताहर) : ट्रेलरवर असलेले बँकेचे कर्ज चुकवण्यासाठी ट्रेलरवर दुसऱ्या ट्रेलरची नंबर प्लेट लावून शासनाची फसवणूक करणाऱ्या शिवम ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रेलर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी पकडण्याची कारवाई केली आहे. पोलिसांनी या कारवाईत ट्रेलरचालकासह ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालक व सुपरवायझर या तिघांविरोधात बनावटगिरी करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच ट्रेलरचालक हरिचंद्र रामलखन यादव (वय ५२) याला अटक केली आहे व बनावट नंबरप्लेट असलेला ट्रेलर जप्त केला आहे.

एपीएमसीतील एस. एस. लॉजिस्टीक व शिवम ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये माल वाहतुकीसाठी एकाच नंबरचे दोन ट्रेलर चालवण्यात येत असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर शिऊरकर व त्यांच्या पथकाने १४ सप्टेंबर रोजी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे नाका येथे महापेच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांवर पाळत ठेवली होती. यावेळी तुर्भे नाका येथे दोन वेगवेगळ्या क्रमांकाचे ट्रेलर उभे असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी संशयावरून सदरचे दोन्ही ट्रेलर तपासणीसाठी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांना तुर्भे ओव्हरब्रीज येथे आणखी एक ट्रेलर आढळून आला. या ट्रेलरवरील नंबरप्लेट व पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोनपैकी एका ट्रेलरवरील नंबरप्लेट सारखीच असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी ट्रेलरचालकासह सदर ट्रेलर ताब्यात घेऊन त्याच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97447 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..