वाशीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाशीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग
वाशीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

वाशीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १८ (वार्ताहर) : वाशी परिसरात मोटारसायकलवरून फिरणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने १५ वर्षीय मुलीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून तिला भररस्त्यात आपले गुप्तांग दाखवून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सायंकाळी वाशी सेक्टर-१५ मध्ये घडला. वाशी पोलिसांनी या व्यक्तीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
या घटनेतील अल्पवयीन पीडित मुलगी वाशी परिसरात राहण्यास असून ती शनिवारी सायंकाळी चित्रकलेच्या क्लासला जात होती. यावेळी ती वाशी सेक्टर-१५ मधील मराठा भवनच्या मागच्या गल्लीतून पायी चालत जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने पीडित मुलीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. त्यानंतर त्याने सदर मुलीला आपले गुप्तांग दाखवून त्या ठिकाणावरून पलायन केले. या प्रकारानंतर घाबरलेल्या पीडित मुलीने तत्काळ आपले घर गाठून घडल्या प्रकाराची माहिती आपल्या पालकांना दिली. त्यानंतर पीडित मुलीने वाशी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. विनयभंग करून पळून गेलेल्या व्यक्तीला दाढी, मिशी असून त्याने चष्मा घातलेला आहे. तसेच तो अंदाजे २५ ते ३० वयोगटातील असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसी टीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97448 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..