मुंबईला पुन्‍हा खड्ड्यांचे ग्रहण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईला पुन्‍हा खड्ड्यांचे ग्रहण
मुंबईला पुन्‍हा खड्ड्यांचे ग्रहण

मुंबईला पुन्‍हा खड्ड्यांचे ग्रहण

sakal_logo
By

चेंबूर, ता. १८ (बातमीदार) ः मुंबईत पावसाचा जोर वाढत चालला आहे तशी रस्त्यांवरील खड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावत असल्याने कोंडीत भर पडत असल्याने वाहनचालकांना त्याचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शहर आणि उपनगरांतील मोठमोठ्या रस्त्यांसह गल्लीबोळातील मार्गही खड्ड्यांत गेल्याने मुंबईकर संताप व्यक्त करत आहेत.

नाहूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील हरिचंद्र कोपरकर मार्ग, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर, भांडुप, चेंबूर, कुर्ला इत्यादी उपनगरांतील एलबीएस मार्ग व विद्याविहार रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे तेथून जाताना वाहनचालक व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांत रस्ते की रस्त्यावर खड्डे, असा सवाल नागरिक करताना दिसत आहेत.
नाहूर रेल्वेस्थानकाजवळील हरिचंद्र कोपरकर मार्गाची चाळण झाली आहे. मुलुंड-गोरेगाव लिंक रोडच्या मार्गाला तो जोडण्यात आला आहे. वाहनचालक आणि नागरिक नाहूर, भांडुप आणि कांजूरमार्गमार्गे जाण्यासाठी त्याचाच वापर करतात. मार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी सुरू करण्यात आले होते; परंतु ते अद्याप अपुरेच आहे. कोपरकर मार्गावरच डीएव्ही कॉलेज, मेमन महाविद्यालय आणि पालिकेची शाळा आहे. तेथील विद्यार्थ्यांना खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. वाहनचालकांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत असल्‍याने कंबरदुखीच्‍या आजाराला सामोरे जावे लागत आहे. उपनगरातील गरुडिया नगरमधील विद्याभवन सब-वे, कांजूरमार्ग, रेल्वेस्थानक, घाटकोपर शिवराज चौक पूर्व, एलबीएस मार्ग, कुर्ला बेस्ट डेपो, नेहरू नगर, कुर्ला सिग्नल, झेंडा नगर, रमाबाई नगर, गोवंडी व चुनाभट्टी भागातील मार्गाची अशीच दुरवस्था आहे. खड्ड्यांबाबत तक्रारी वाढू लागल्या की पालिकेला जाग येते. नंतर पालिका ठेकेदारामार्फत तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवून घेत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

पावसाळ्या पूर्वीपासून खड्डे आहेत. खड्ड्यांतूनच वाहन चालवावे लागत आहे. त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक प्रतिनिधी व पालिका त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
- प्रबोध तांबे, रहिवासी

गणेशोत्‍सवापूर्वी मुंबईतील खड्डे बुजवले जातील, असे अश्‍वासन पालिकेने दिले होते. मात्र कुठेही गेलो तरी खड्ड्यांचा सामना करावा लागतो. परिणामी महिला, नोकरदार व गृहिणींना कंबरेचे आजार होत आहेत. याला जबाबदार कोण?
- स्वानंदी जी. टी., प्राध्यापक

आरे रस्ता खड्ड्यात
गोरेगावमधील आरे-मरोळ रस्त्याची पार दुरवस्था झाली आहे. मेट्रो कारशेडजवळ असलेला रस्ता पार खड्ड्यांत गेला आहे. दिवसभरात अनेक वाहने येथून मार्गक्रमण करत असतात. मात्र, रस्त्यावर पडलेले भलेमोठे खड्डे चालकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. ते तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97452 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..