आमदाराशी संबंधित कंपनीत डाटाचोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदाराशी संबंधित कंपनीत डाटाचोरी
आमदाराशी संबंधित कंपनीत डाटाचोरी

आमदाराशी संबंधित कंपनीत डाटाचोरी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १८ : मुंबई भाजप आमदार मिहिर कोटेचा यांच्या ग्रीनविच मेरिडियन लॉजिस्टिक नावे कंपनीने दिलेल्या डाटा चोरीच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
एका अज्ञात व्यक्तीने कंपनीच्या संगणक प्रणालीवर त्यांच्या क्लायंटचे तपशील असलेल्या महत्त्वपूर्ण फाईल चोरल्या. संशयिताने नंतर चोरलेली फाईल कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याला ई-मेल केली, ज्याने नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर स्वतःची लॉजिस्टिक कंपनी सुरू केली होती. पवई येथे मुख्यालय असलेल्या आणि मालाची आयात-निर्यात करणाऱ्या ग्रीनविच मेरिडियन लॉजिस्टिकचे आयटी व्यवस्थापक धीरेंद्र श्रीवास्तव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार मिहिर कोटेचा कंपनीचे संचालक आहेत.
...
माजी कर्मचाऱ्यांवर संशय
पोलिस तक्रारीनुसार श्रीनिवासन रमेश हा कर्मचारी कोटेचा यांच्या कंपनीत प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून चेन्नई, बंगळुरु आणि हैदराबाद येथील कंपनीच्या कार्यालयांचे कामकाज पाहत होता. त्यांनी ९ एप्रिल २०२१ रोजी सेवेचा राजीनामा दिला आणि नंतर स्वतःची लॉजिस्टिक्स सेवा देणारी कंपनी सुरू केली. श्रीनिवासन रमेशच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या ई-मेल खात्यावर त्याचा प्रवेश बंद करण्यात आला. त्याच महिन्यात कंपनीच्या चेन्नई कार्यालयातील आणखी एक कर्मचारी अजितकुमार यांनी राजीनामा दिला आणि रमेशच्या नव्याने सुरू झालेल्या कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून रुजू झाले. त्याच्यावर संशय असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97456 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..