आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त

sakal_logo
By

नवी दिल्ली, ता. १८ ः आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली आहे. सध्या ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत ९१ डॉलर प्रति बॅरल इतकी आहे. दरम्यान कच्च्या तेलाचे भाव कमी झाले असले तरी देशातील पेट्रोल-डिेझेलच्या किमती कमी झाल्या नाहीत.

भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने याबद्दल नुकतीच एक माहिती जारी केली आहे. त्यानुसार सध्या देशात सर्वात स्वस्त दरात पेट्रोल-डिझेल पोर्टब्लेअर येथे विकले जात आहे. तिथे पेट्रोलची किंमत ८४.१० रुपये प्रती लिटर तर डिझेलची किंमत ७९.७४ रुपये प्रती लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रती लिटर आहे. याआधी २२ मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील जकात कर कपात केली होती. त्यानंतर महाराष्ट्राने जुलै महिन्यात पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केला होता. मात्र, देशातील इतर कुठल्याही राज्याने या दरम्यान किमती कमी करण्याचा प्रयत्न केला नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमतीच्या आधारे ऑईल मार्केटिंग कंपन्या दरांची समीक्षा करतात आणि त्यानुसार पेट्रोल-डिझेलचे दर निश्चित करतात. राज्यस्तरावरही पेट्रोल-डिझेलवर कर लागू केला जातो. त्यामुळे प्रत्येक राज्यात या किमती वेगवेगळ्या असतात.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97462 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..