भिवंडीत अखेर तीन दिवसांनी सापडले वायरमनचे शव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत अखेर तीन दिवसांनी सापडले वायरमनचे शव
भिवंडीत अखेर तीन दिवसांनी सापडले वायरमनचे शव

भिवंडीत अखेर तीन दिवसांनी सापडले वायरमनचे शव

sakal_logo
By

भिवंडी, ता. १८ (बातमीदार) : उच्च दाबाच्या वीजवाहिनीला लटकून पलीकडील वीजखांबाला जोडणीसाठी व दुरुस्तीसाठी गेलेल्या वायरमनला वेळीच मदत न मिळाल्याने त्याचा नदीच्या प्रवाहात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. त्याचे प्रेत आज रविवारी दुपारी त्याच नदीच्या झाडीत अडकलेल्या स्थितीत आढळले.
उबेद्दूर रहमान अंसारी (वय ३६) असे कांबा गावातील नदीत बुडालेल्या वायरमनचे नाव असून या नदीचा प्रवाह खाडीला जाऊन मिळतो. उबेद्दूर रेहमान हा शांतीनगर येथे राहणारा असून तो आपल्या भावासह शुक्रवारी सायंकाळी कांबेगाव येथे वीज कंपनीच्या एका खासगी कंत्राटदाराकडे विजेचे काम करत होता. कांबा गावात शासनाच्या वीज कंपनीचे सब स्टेशन असून नदीपलीकडील विजेच्या खांबावरून विजेची दुरुस्ती न केल्याने शहरातील वीजपुरवठ्यास अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे ही दुरुस्ती करण्याचे काम खासगी ठेकेदारमार्फत सुरू होते. या ठेकेदाराने सांगितल्यानुसार पाण्याचा प्रवाह कमी असताना उबेद्दूर रहमान पलीकडे खांबावर दुरुस्तीसाठी गेला; मात्र तो परत येत असताना केबलखालील नदीचा प्रवाह वाढल्याने त्यास जमिनीवर येण्यास विलंब लागला आणि केबलवरून खाली प्रवाहात पडून दलदलीत अडकला, अशी माहिती नागरिकांकडून देण्यात येते.
शनिवारी सायंकाळपर्यंत उबेद्दूर रहमानचा मृतदेह अग्निशामक दलाच्या जवानांना सापडला नव्हता. निझामपुरा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली होती. पुन्हा रविवारी त्याचा शोध घेण्यास पोलिस आणि अग्निशमन दलाने सुरू केले, तेव्हा दुपारी हा मृतदेह दलदलीत सापडला; मात्र अशा वेळी महापालिकेचे आणि ग्रामीण आपत्ती व्यवस्थापन काय करीत होते, असे प्रश्नचिन्ह नागरिकांतून उमटत असून या घटनेची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97465 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..