ठाण्यात घराची भिंत शेजारील घरावर कोसळल्याची घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात घराची भिंत शेजारील घरावर कोसळल्याची घटना
ठाण्यात घराची भिंत शेजारील घरावर कोसळल्याची घटना

ठाण्यात घराची भिंत शेजारील घरावर कोसळल्याची घटना

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : लोकमान्यनगर पाडा क्रमांक- ४, येथील पाण्याच्या टाकीजवळील संतोष पाटील चाळीमधील शीला यादव यांच्या घराची भिंत जवळच असलेल्या प्रकाश उपडे यांच्या घरावरती कोसळल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीतचे कार्यालयीन अधीक्षक, कार्यकारी अभियंता, बीट निरीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली, तरी शीला रामजेश यादव, प्रकाश उपडे, सुमन धीरेंद्र सिंग, शीला चंद्रशेखर जसवार, मोहम्मद युनूस यांच्या मालकीचे पाच घरे रिकामी करत त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97466 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..