रोड अपघातात चालक जखमी; घोडबंदर रोडवरील घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोड अपघातात चालक जखमी; घोडबंदर रोडवरील घटना
रोड अपघातात चालक जखमी; घोडबंदर रोडवरील घटना

रोड अपघातात चालक जखमी; घोडबंदर रोडवरील घटना

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १८ : मानपाडा-चितळसर, दोस्ती इम्पिरियासमोरील ठाणे-घोडबंदर उड्डाण पुलाच्या सुरुवातीला पालिकेच्या स्ट्रीट पोलला कारने धडक दिल्याची घटना रविवारी पहाटे ४ वाजून ५३ मिनिटांच्या सुमारास घडली. ही धडक इतकी जोरात होती की स्ट्रीट पोल रस्त्यावर पडले, या अपघातात कारचालक गौरव मेहता (वय ३८) हे जखमी झाले. अपघातानंतर वाहन हायड्रा क्रेनच्या साह्याने बाजूला करून घोडबंदर रोड वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. यामध्ये आझादनगर येथील रहिवासी असलेले गौरव मेहता यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे व कारचेही नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, चितळसर पोलिस, तसेच ठामपा विद्युत विभागाचे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97467 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..