यंदा ठाण्यात घुमणार ‘रासरंग ठाणे-२०२२’चा गरबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा ठाण्यात घुमणार ‘रासरंग ठाणे-२०२२’चा गरबा
यंदा ठाण्यात घुमणार ‘रासरंग ठाणे-२०२२’चा गरबा

यंदा ठाण्यात घुमणार ‘रासरंग ठाणे-२०२२’चा गरबा

sakal_logo
By

ठाणे, ता. १९ (वार्ताहर) : कोरोनानंतर पुन्हा एकदा ठाण्यात गरबा नृत्याचा सांस्‍कृतिक वारसा जपला जाणार आहे. ‘रासरंग ठाणे-२०२२’च्या उत्सवाची जोरदार तयारी आणि आधुनिकतेचा आविष्कार, विद्युत रोषणाईचा झगमगाट, विविध पारंपरिक आणि अत्याधुनिक वाद्यवृंदांचा आविष्कार, विविध वेशभूषा ठाणेकरांचे आकर्षण ठरणार आहे. २०१७ पासून सुरू करण्यात आलेल्या गरबा नृत्याच्या या कार्यक्रमाला यंदा १२ हजार गरबाप्रेमी हजेरी लावणार असल्याची माहिती दिली.
यंदा ‘रासरंग ठाणे-२०२२’साठी एमसीएचआय केडाय, आशर ग्रुप, फेअरप्ले, जनसेवा प्रतिष्ठान आणि जितो ठाणे यांनी जय्यत तयारी केलेली असून २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत मोठ्या उत्साहात हा जल्लोष ठाणे शहरातील मॉडेला मिल कंपाऊंड, ठाणे-मुलुंड सर्कल, चेकनाका येथे पार पडणार आहे. या गरबा नृत्यामध्ये ठाणे आणि मुंबई परिसरातील गरबाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवणार असल्याचा विश्वास जितेंद्र मेहता यांनी व्यक्त केला. यंदा गरबाप्रेमी आणि ठाणेकरांना उत्सव ‘रासरंग ठाणे-२०२२’मध्ये नवरात्रीचे ढोलकिंग, रॉक स्टार, नैतिक नागदा याचा ठेका आकर्षण ठरणार आहे. नैतिक नागदा यांच्या ठेक्यावर ठाणेकर आणि मुंबईकर ताल धरणार आहेत. या जल्लोषात उमेश बारोट, कोषा पंड्या, दिव्या जोशी आणि अंबर देसाई यांचे लाईव्ह परफॉर्मन्स होणार आहेत. हे विशेष नृत्यच ठाणेकरांचे यंदाचे आकर्षण ठरणार आहे. १८ सप्टेंबर रोजी उत्सवाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.
----
२८ व २९ सप्टेंबर रोजी दिव्‍यांग मुलांचा गरबा
सामाजिक बांधिलकी म्हणून यंदा २८ आणि २९ सप्टेंबर रोजी ठाणे पालिकेच्या शाळांमधील मुलांचे गरबा नृत्य होणार आहे. त्यासोबतच ‘रासरंग ठाणे-२०२२’मध्ये अपंग, ज्‍येष्ठ नागरिक यांचेही गरबा नृत्य होणार आहे.
---
विद्युत रोषणाई, लाईव्ह नृत्याची धूम
दोन वर्षांनंतर हे पहिले जल्लोषाचे वर्ष असल्याने यंदा मोठी गर्दी होणार आहे; तर यंदा या उत्सवाच्या जल्लोषाचे चित्रण हे रोबोटिक कॅमेऱ्याद्वारे करण्यात येणार आहे. हेही ठाणेकरांचे आकर्षण ठरणार आहे.

===
‘रासरंग ठाणे-२०२२’मध्‍ये यंदा अनेक नवे आविष्कार पाहायला मिळतील. ठाणेकरांनी आणि एमएमआर रिजनमधील नागरिकांना आवाहन आहे, की या जल्लोषात सामील व्हा आणि आनंद लुटा.
- जितेंद्र मेहता (अध्यक्ष, एमसीएचआय केडाय)

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97471 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..