यंदाच्या दिवाळीत हवाईसेवा महागडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंदाच्या दिवाळीत 
हवाईसेवा महागडा
यंदाच्या दिवाळीत हवाईसेवा महागडा

यंदाच्या दिवाळीत हवाईसेवा महागडा

sakal_logo
By

मुंबई, ता. १८ : कोरोनानंतर दोन वर्षांनी यंदा दिवाळी धूमधडाक्यात साजरी होणार असल्याने या काळात देशांतर्गत विमानप्रवासामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत विमानांच्या तिकीटदरांमध्ये जवळपास १० ते १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. प्रवाशांची जादा मागणी आणि मर्यादित उड्डाणांमुळे ही भाडेवाढ झाल्याचे सांगण्यात आले.
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा विमान प्रवाशांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सरासरी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पर्यटनासाठी अनेक जण बाहेर पडतात. त्यानंतर दसरा-दिवाळीदरम्यान विमान प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. आगामी दिवाळीसाठी विमानांचे तिकीट आरक्षण सुरू झाले असून काही व्यावसायिक मार्गांवर विमानभाडे १८-३० टक्क्यांनी वाढले आहे. कमी उड्डाणे असलेल्या नॉन-मेट्रो शहारांसाठी भाडे अधिक असणार आहे. एरवी मुंबई ते नॉन-मेट्रो शहरांसाठी विनाथांबा विमानसेवा माफक दरात उपलब्ध असते; मात्र यंदाच्या दिवाळीत त्यातही मोठी दरवाढ झाली आहे. विशेष म्हणजे मुंबई ते अलाहाबाद, रायपूर, रांची, दरभंगा, लखनौ, गुवाहाटी, मदुराईचे तिकीट सुमारे २० हजार रुपयांपर्यंत वाढले आहे.
---
मेट्रो शहरांतून महागडा प्रवास
विशेषत: मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळूरू आदींसारख्या निवडक शहरांमधून उड्डाण करणाऱ्या अनेक विमानांच्या भाड्यात वाढ झाली आहे. या चार ठिकाणांहून अंदमानसाठीच्या तिकीटदरामध्ये २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. तसेच गोव्यासाठी १५-२० टक्के, केरळ आणि हिमाचलसाठी ५ टक्के आणि काश्मीरसाठी १०-१५ टक्के दरवाढ झाली आहे.
---
या मार्गावर दरवाढ नाही
विमान उद्योगाशी संबंधित तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनानंतरही निर्बंध उठल्यानंतर विमानांच्या तिकीटदरांमध्ये फारसा फरक पडलेला नाही; मात्र काही मार्गांवरील विमान भाड्यांमध्ये कपात करण्यात आली आहे. विशेषतः अमृतसर, लखनौ, डेहराडून, सुरत, नागपूर आणि पुणे या मार्गांवरील विमानांच्या तिकिटे पूर्वीपेक्षा ८-१० टक्के स्वस्त झाली आहेत.
---
विमानांचे तिकीटदर
मार्ग------ ---यंदा------ गतवर्षी
मुंबई ते चेन्नई --७४०० ----६५००
मुंबई ते बेंगळूरू--८६०० --- ७७००
मुंबई ते हैदराबाद-- ८९०० --- ८१००
मुंबई ते दिल्ली--- १४००० ----१२५००
मुंबई ते कोलकाता---१८००० ----१६५००
--------
२०२१ च्या तुलनेत आगामी सणासुदीच्या हंगामासाठी विमानप्रवाशांमध्ये पाच ते सात टक्के वाढ झाली आहे. परिणामी यंदा विमानभाड्यांमध्ये दहा ते बारा टक्के वाढ झाली आहे.
- संजय दवे, नागरी उड्डाणतज्ज्ञ
----------
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विमान भाड्यात १० टक्के वाढ होणार आहे. हवाई क्षेत्रासाठी हे चिंताजनक आहे. कारण अधिक भाडेवाढ झाल्यास ग्राहक अन्य पर्यायांचा वापर करू शकतात.
- मुस्तफा शेख, ट्रॅव्हल एजंट
-----

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97478 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..