कोपरखैरणे, घणसोलीत घामाच्या धारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोपरखैरणे, घणसोलीत घामाच्या धारा
कोपरखैरणे, घणसोलीत घामाच्या धारा

कोपरखैरणे, घणसोलीत घामाच्या धारा

sakal_logo
By

वाशी, ता.१८ (बातमीदार) ः दोन-तीन दिवसांपासून नवी मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक भागांत पावसाने जोर धरल्याने त्याचा परिणाम विद्युत पुरवठ्यावर होत असून शुक्रवारी रात्रीपासून घणसोली, कोपरखैरणे विभागातील काही परिसरांमधील पुरवठा खंडित झाल्यामुळे रात्र अंधारात काढण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
सुनियोजित शहर असलेल्या नवी मुंबईतील कोपरखैरणे, घणसोलीसह गावठाण भागातील विविध सेक्टरमधील वीजपुरवठ्याची प्रणाली जुनी झाली आहे. त्यामुळे वादळवाऱ्यासह आलेल्या पावसात या भागांमधील वीजपुरवठा तत्काळ खंडित होत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. शुक्रवारी रात्री देखील कोपरखैरणे सेक्टर १९ सी मधील (गावठाण भाग) घणसोली गाव, कोपरखैरणे सेक्टर १५ ते १८ मधील वीजपुरवठा खंडित झाला होता. यातील घणसोली गाव व कोपरखैरणे सेक्टर१९ च्या काही भागातील वीजपुरवठा पहाटे सुरू झाला. मात्र, अनेक भागांत कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने सकाळच्या वेळी विद्युत उपकरणे वापरता येत नसल्याने रहिवाशांचा खोळंबा झाला होता. याबाबत कोपरखैरणे विभाग महावितरण कार्यालयास विचारणा केली असता, वाशी फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण देण्यात आले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97504 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..