शहापूर तालुक्यातील २१ खेडी रोहित्राविना अंधारात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापूर तालुक्यातील २१ खेडी रोहित्राविना अंधारात
शहापूर तालुक्यातील २१ खेडी रोहित्राविना अंधारात

शहापूर तालुक्यातील २१ खेडी रोहित्राविना अंधारात

sakal_logo
By

खर्डी, ता. १९ (बातमीदार) : महावितरणने बिघाड झालेले व चोरीला गेलेले रोहित्र बदलून न दिल्याने, शहापूर तालुक्यातील २१ खेड्यांत पूर्णपणे अंधार पसरला आहे. याबाबत महावितरणकडे वारंवार मागणी व तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. रोहित्र उपलब्ध नसल्याचे कारण अधिकारी देत असल्याने नागरिक महावितरणविरोधात संताप व्यक्त करीत आहेत.
शहापूर तालुक्यातील, दहीगाव, कांबडीपाडा, प्रधानपाडा, साठगाव, आठगाव, मानिचापाडा, अल्याणी, भागदळ, पेंढरी, रातांधळे, पिंगळवाडी, टेंभा, आगळवाडी, गांगणवाडी, निचितेपाडा, भगतपाडा, खालचाटेंभा, बांधलवाडी, खैरपाडा, रातांधळे येथील आदिवासी वाड्यांमधील रोहित्रात गेल्या महिनाभरापासून बिघाड झाला आहे. रोहित्रच उपलब्ध नसल्याने १२०० च्या आसपास वीजग्राहक अंधारात आहेत.
तालुक्यातील सर्व खेडी, आदिवासी वाड्या या जंगलात असल्याने येथे साप, विंचू सारख्या विषारी प्राण्यांचा वावर असतो. रात्री अंधारात येथे रहिवाशांना चाचपडत जावे लागते. सात दिवसांपूर्वी टेंभा येथील दोन वर्षीय मुलीचा साप चावून मृत्यू झाल्याची घटना घडली. या आदिवासी बांधवांच्या घरात विजेचा प्रकाश येत नसल्याने त्यांचा विकास खुंटल्याची खंत श्रमजीवी संघटनेचे तालुका सचिव प्रकाश खोडका यांनी व्यक्त केली.
--------------------
सध्‍या पावसामुळे रोहित्रात बिघाड होण्‍याच्‍या अनेक तक्रारी आहेत. उपलब्ध रोहित्रानुसार वाटप सुरू असून, येत्या चार-पाच दिवसांत शहापूर तालुक्यातील खेड्यांना रोहित्र उपलब्ध करून देण्यात येतील.
- दिलीप भोळे, अभियंता कल्याण मंडळ २, महावितरण.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97506 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..