भांडुपमध्‍ये महिला तक्रार निवारण मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भांडुपमध्‍ये महिला तक्रार निवारण मोहीम
भांडुपमध्‍ये महिला तक्रार निवारण मोहीम

भांडुपमध्‍ये महिला तक्रार निवारण मोहीम

sakal_logo
By

भांडुप, ता. १९ (बातमीदार) ः मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या संकल्पनेतून महिला तक्रार निवारण दिन कांजूरमार्ग पोलिस ठाण्यात साजरा करण्यात आला. सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेखा कपिले यांच्या मार्गदर्शनाखाली कांजूरमार्ग वरिष्ठ पोलिस निरीक्षक इक्बाल आवळकर यांनी तक्रारदार महिलांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये कौटुंबिक अत्याचार, फसवणूक, आरोपीकडून होणारा त्रास या विषयी तक्रार केल्यानंतर येणाऱ्या अडचणी महिलांनी पोलिसांसमोर मांडल्या. या वेळी त्‍यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले. भविष्यात कोणताही त्रास झाल्यास पोलिस त्‍यांच्‍या पाठीशी उभे असतील, अशी ग्वाही देण्यात आली. या वेळी पोलिस निरीक्षक संतोष कदम, पोलिस उपनिरीक्षक शीतल बाबर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97512 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..