मुलुंडमध्ये लेखन स्पर्धा पारितोषिक वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडमध्ये लेखन स्पर्धा पारितोषिक वितरण
मुलुंडमध्ये लेखन स्पर्धा पारितोषिक वितरण

मुलुंडमध्ये लेखन स्पर्धा पारितोषिक वितरण

sakal_logo
By

मुलुंड, ता. १९ (बातमीदार) ः महाराष्ट्र सेवा संघाचा मैत्रेयी हा महिला विभाग आणि साहित्य सम्राट न. चिं. केळकर ग्रंथालय यांच्‍या संयुक्त विद्यमाने ‘मला काय वाटतं’ या विषयावर लेखन स्‍पर्धा आयोजित केली होती. महाराष्ट्रामधील विविध भागांतून तसेच परदेशातून एकूण ३७ स्पर्धकांनी या लेखन स्पर्धेत भाग घेऊन विविध विषयांवरील आपली मते मांडली. या स्पर्धेचे परीक्षक साहित्यिका माधुरी ताम्हाणे आणि सुहास जोशी होते. शनिवारी (ता. २४) दुपारी ४. ३० वाजता या लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ, सेवा संघाच्या सुविधा शंकर गोखले सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे. या वेळी पारितोषिकप्राप्त लेखांचे अभिवाचनही होणार आहे. कार्यक्रम मोफत असून सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97516 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..