ई-सिगारेटमुळे तरुणाई धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

e-cigarettes
ई-सिगारेटमुळे तरुणाई धोक्यात

ई-सिगारेटमुळे तरुणाई धोक्यात

मुंबई - सिगारेटपाठोपाठ आता ई-सिगारेटकडे तरुणांचा ओढा वाढत आहे. अनेक शाळकरी तसेच महाविद्यालयीन तरुणांमध्ये ई-सिगारेटची लाट आली आहे. ७५० रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत मिळणारी ई-सिगारेट आता शिक्षक आणि पालकांची डोकेदुखी बनली आहे. त्यामुळे ई- सिगारेटवर बंदी घालण्याची मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे राज्य सचिव भिमेश मुतुला यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

ई-सिगारेट ही सिगारेटसारखीच दिसते. काही नव्या ई-सिगारेट पेनड्रार्इव, पेन, लायटरच्या आकारातही उपलब्ध असतात. ई-सिगारेटमध्ये तंबाखूऐवजी द्रवरूपातील निकोटिन असते. एका लहान बॅटरीच्या आधारे द्रवरूप निकोटिनची वाफ तयार होऊन ती ओढली जाते. या वाफेला प्रत्यक्ष धूम्रपानासारखा वास नसतो. शिवाय राखही तयार होत नाही. त्यामुळे मधल्या सुट्टीत अनेक विद्यार्थी ई-सिगारेटचे झुरके घेतात. काही विद्यार्थी त्यामुळे भरवर्गात पेंगलेले दिसतात. विशेष म्हणजे याबाबत कारवाई करण्याचे अधिकार नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ई-सिगारेटवर बंदी घालावी, अशी मागणी केल्याचे मुतुला यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97522 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :YouthDangerCigarette