संत तुकाराम महाराज पुलाचे रुंदीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संत तुकाराम महाराज पुलाचे रुंदीकरण
संत तुकाराम महाराज पुलाचे रुंदीकरण

संत तुकाराम महाराज पुलाचे रुंदीकरण

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १९ (बातमीदार) ः जागृती नगर मेट्रो स्थानकाखाली होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी अखेर संत तुकाराम महाराज पुलाचे रुंदीकरण होणार आहे. शिवसेना माजी नगरसेविका अश्विनी हांडे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
२० फूट रुंद असलेला संत तुकाराम महाराज पूल घाटकोपर, अंधेरी लिंक रोड मार्गे, जगलेश्वर रोड, परेरावाडी व भटवाडीकडे जाण्यासाठी महत्त्वाचा सेतू ठरत आहे; मात्र पुलावर होत असलेल्या वाहतूककोंडीमुळे ध्वनी व वायुप्रदूषणाला नागरिकांना सामोरे जावे लागते. त्‍यामुळे या पुलाचे रुंदीकरण आवश्‍यक झाले होते. अश्विनी हांडे यांनी या पुलाचे काम लवकरच हाती घेणार असल्‍याचे सांगितले आहे. माजी नगरसेवक दीपक हांडे यांनी रविवारी सदर पुलाची पाहणी करून मेजरटेपद्वारे मोजमाप केले.

२० फूट असलेल्या संत तुकाराम महाराज ब्रीजचे ६० फुटापर्यंत रुंदीकरण होणार आहे. पालिकेकडे आम्ही रुंदीकरणासाठी अर्ज केला आहे. काम सुरू झाल्यास एक वर्षात या पुलाचे रुंदीकरण पूर्ण होईल.
- अश्विनी हांडे, माजी नगरसेविका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97535 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..